About Us

नमस्कार मी सौरभ आंगचेकर “अभंग Records” प्रस्तुत “वैभव दशावताराचे” या Website मध्ये सर्व दशावतार प्रेमींचे सहर्ष स्वागत.

येथे तुम्हाला दशावताराबद्दल अधिकाधिक माहितीचा खजिना मिळेल – त्याचा इतिहास, महत्त्व, तंत्र आणि बरेच काही….दशावतार हा केवळ एक कलाप्रकार नाही तर तो कोकणी लोकांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळेच ही कला कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याचे प्रतिनिधित्व करते.

Why This Website?

ही Website सुरू करण्याचा उद्देशच हा आहे की आपण सर्व दशावतार कलाप्रेमींनी एकत्र येऊन या कलेला आणि कलाकारांना जास्तीत जास्त कसे समृध्द करता येईल?! याचा विचार करणे व दशावताराची महती व महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे. जर हे साध्य करण्यात आपण यशस्वी झालो तर डॉक्टर, इंजिनिअर प्रमाणे दशावतारातही करियर करू पाहणाऱ्या युवा पिढीला घरातून कोणत्याही प्रकारचा विरोध सहन करावा लागणार नाही आणि तेव्हाच आपल्याला छाती ठोकून अभिमानाने सांगता येईल की दशावताराला चांगले दिवस आले आहेत.

Share Your Wisdom

आमचा उद्देश फक्त तुम्हाला दशावताराबद्दल माहिती देणे किंवा भविष्यातील सुधारणांसाठी उपदेश देणे हा नसून कलाप्रेमींची एक Community तयार करणे हा आहे जेणेकरून सर्वांना मिळून फक्त समस्यांवर न बोलता उपायांवर चर्चा करता येईल.

जर तुम्हाला या समृध्द लोककलेबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे असेल किंवा तुमचे विचार व तुम्हाला असलेली महत्त्वपूर्ण माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचवायची असेल किंवा या आपल्या मातीतल्या कलेला अजून पुढे नेण्यासाठी काही भन्नाट कल्पना तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही आवर्जून आम्हाला आमच्या Social Media वर किंवा Email वर संपर्क करू शकतात.

सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने आपण नक्कीच जागतिक पातळीवर दशावताराला नावलौकिक प्राप्त करून देऊ अशी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद!

error: Error 404